
सप्टेंबर महिना गाजवल्यानंतर नुकताच मान्सून माघारी परतला असतानाच आता पुन्हा एकदा चक्रीवादळ येणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ सक्रीय होत आहे. त्यामुळे महाराष्ट्रसह काही राज्यांमध्ये पुन्हा एकदा पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने याबाबत इशारा दिला आहे.ॉ
अंदमान आणि निकोबार बेटांच्या परिसरात एक चक्रीवाद तयार झाले असून ते केरळमार्गे देशाच्या मध्य व उत्तरेकडे सरकत आहे. याचा परिणाम केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक, ओडिशा, महाराष्ट्र, छत्तीसगड, गोवा, जम्मू-कश्मीर, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेश या ११ राज्यांवर होणार असून या राज्यांमध्ये 21 ऑक्टोबर ते 23 ऑक्टोबर दरम्यान विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.