
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यासाठी 3 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. विलंब शुल्कासह हे अर्ज सादर करावे लागणार आहेत. याआधी अर्ज भरण्यासाठी 20 ऑक्टोबरपर्यंत मुदत होती. नियमित व विलंब शुल्काने अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क मंडळाकडे जमा करण्यासाठी 7 नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. कनिष्ठ महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांच्या याद्या व प्रीलिस्ट विभागीय मंडळांकडे जमा करण्यासाठी 10 नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. दहावीचे अर्ज भरण्यासाठी 27 ऑक्टोबरपर्यंत मुदत आहे. ही मुदतदेखील वाढवली जाण्याची शक्यता आहे.


























































