
साताऱ्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्या प्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणातील दुसरा प्रमुख आरोपी प्रशांत बनकर याला पोलिसांनी पुण्यातून अटक केली आहे. मित्राच्या फार्म हाऊसवर लपून बसलेल्या बनकरला ग्रामीण पोलिसांनी पहाटे चार वाजता ताब्यात घेत शहर पोलिसांकडे सोपवले.
प्रशांत बनकर याच्यावर डॉ. संपदा मुंडे यांचा शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचा आरोप आहे. संपदा मुंडे यांनी हातावर पेनाने लिहिलेल्या सुसाईट नोटमध्येही पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदनेसह प्रशांतचेही नाव होते. हे प्रकरण समोर आल्यापासून पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. दोघेरी फरार होते. यापैकी प्रशांत बनकर याला बेड्या ठोकण्यात आल्या असून प्रमुख आरोपी पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदने अद्यापही फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत, अशी माहिती साताऱ्याचे एसपी तुषार दोशी यांनी दिली.

कोण आहे प्रशांत बनकर?
डॉ. संपदा मुंडे या मूळच्या बीड जिल्ह्यातील रहिवासी होत्या आणि फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होत्या. या काळात त्या फलटणमध्येच एका ठिकाणी पेइंग गेस्ट म्हणून राहत होत्या. फटलटमध्ये त्या जिथे राहत होत्या त्या घरमालकाचा प्रशांत बनकर हा मुलगा होता. पोलीस निरीक्षक गोपाल बदनेसह त्यानेही संपदाला त्रास दिला होता. या त्रासाला कंटाळून महिला डॉक्टरने गळफास घेत जीवन संपवले.
सातारा डॉक्टर आत्महत्या प्रकरण – फडणवीस गृहमंत्री म्हणून नापास, राजीनामा द्या! – अंबादास दानवे



























































