
केंद्रिय गृहमंत्री अमित शहा मुंबईत दाखल झाले आहेत. अशातच त्यांच्या स्वागताचे जागोजागी होर्डिंग लागले आहेत. या होर्डिंगवरुन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी भाजपवर संताप व्यक्त केला आहे. स्वातंत्र्य लढ्यात आणि देशाच्या जडणघडणीत मोलाचं योगदान दिल्याने जनतेने सरदार पटेल यांना आदराने #लोहपुरूष ही उपाधी दिली. कार्यकर्त्यांच्या भावना समजू शकतो मात्र महापुरुषांचा अशा प्रकारे अवमान करणं भाजपने टाळलं पाहिजे असा सल्लाही रोहित पवार यांनी सोशल मीडिया अकाऊंट एक्सवर दिला आहे.
स्वातंत्र्य लढ्यात आणि देशाच्या जडणघडणीत मोलाचं योगदान दिल्याने जनतेने सरदार पटेल यांना आदराने #लोहपुरूष ही उपाधी दिली. जशी #राष्ट्रपिता ही उपाधी महात्मा गांधी सोडून कुणालाच शोभणार नाही तेच लोहपुरूष या उपाधीलाही लागू पडतं. कार्यकर्त्यांच्या भावना समजू शकतो मात्र महापुरुषांचा अशा… pic.twitter.com/RcTsmgMp0b
— Rohit Pawar (@RRPSpeaks) October 27, 2025
रोहित पवार यांनी गृहमंत्री अमित शहा यांचे एक पोस्टर एक्सवर शेअर केले आहे. त्या पोस्टरमध्ये महाराष्ट्राचे लोहपुरुष अमित शहा असा उल्लेख केला आहे. हे पोस्टर पाहून रोहित पवार यांनी भाजपवर संताप व्यक्त करत त्यांना खोचक सल्लाही दिला आहे. रोहित पवार यांनी आपल्या एक्सवर म्हटले आहे की, ”स्वातंत्र्य लढ्यात आणि देशाच्या जडणघडणीत मोलाचं योगदान दिल्याने जनतेने सरदार पटेल यांना आदराने #लोहपुरूष ही उपाधी दिली. जशी #राष्ट्रपिता ही उपाधी महात्मा गांधी सोडून कुणालाच शोभणार नाही तेच लोहपुरूष या उपाधीलाही लागू पडतं. कार्यकर्त्यांच्या भावना समजू शकतो मात्र महापुरुषांचा अशा प्रकारे अवमान करणं भाजपने टाळलं पाहिजे. कदाचित हा फ्लेक्स बघितल्यावर ते गृहमंत्री मा. अमित शाह साहेबांनाही आवडणार नाही”..असे म्हटले आहे.



























































