
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने विद्याथ्र्थ्यांच्या डोळ्यांची काळजी घेतली. मीरा-भाईंदर शहरात शिवसेनेने घेतले ल्या नेत्रचिकित्सा शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मिलेनियम आय सेंटरचे संचालक डॉ. मंजू लालवणी यांनी मार्गदर्शन केले.
मीरा-भाईंदर प्रभाग १८, सुंदरनगर सोसायटी येथे शिवसेना उपजिल्हा संघटक प्राचीसिंह पाटील यांच्या पुढाकाराने शिबीर घेण्यात आले. सध्याच्या युगात मुले सतत मोबाईलवर व्यस्त असतात. त्यामुळे मुलांच्या डोळ्यांवर खूप मोठ्या प्रमाणात परिणाम होतो. मोबाईल चे दुष्परिणाम तसेच डोळ्यांची काळजी कशी घ्यावी याबाबत डॉ. मंजू लालवणी यांनी मुलांसह पालकांना मार्गदर्शन केले. यावेळी अनेक मनोरंजन कार्यक्रम घेऊन आणि उदाहरणे देऊन डोळे संवर्धनाबाबत प्रबोधन करण्यात आले. याप्रसंगी प्रवीण शेट्टी, आनंद खानविलकर, शेखर पाटील, भरत राणे, प्रभाकर भोसले, प्रवीण मुणगेकर, पप्पू राणे, प्रकाश टक्के, योगेश जाधव, मनीषा घेवडे, स्नेहल मोरे, रोहिणी मिस्त्री यांच्यासह नागरिक उपस्थित होते.






























































