Photo – पु. ल. देशपांडे कला अकादमीत अनोखे छायाचित्र प्रदर्शन

नुकतेच वाचा चॅरिटेबल ट्रस्टतर्फे प्रभादेवी येथील पु.ल. देशपांडे कला अकादमी येथे “गली टेल्स: हर लेन्स, हर स्टोरी” या नावाने एक अनोखे छायाचित्र प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. या प्रदर्शनामध्ये झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या किशोरवयीन मुलींनी काढलेली छायाचित्र मांडण्यात आली होती. या छायाचित्रांमध्ये त्यांच्या रोजच्या जगण्यातील विविध घटकांचा कोलाज पाहायला मिळाला. या कार्यक्रमाचे उद्घाटन विद्या कुलकर्णी लेखिका, छायाचित्रकार यांच्या हस्ते करण्यात आले होते. १२ आठवड्यांच्या अभ्यासक्रमात २५ वाचा सहभागींना प्रशिक्षण देणारे फोटोग्राफीसाठी मार्गदर्शन करणारे अमेय आणि प्रतीक देखील यावेळी उपस्थित होते.