
केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्डाने विद्यार्थ्यांना इन्कम टॅक्सचे महत्त्व पटवून देण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. सीबीएसई आणि आयकर विभागाच्या सहकार्याने लोकप्रिय कार्टुन मोटू-पतलूची कॉमिक पुस्तके लॉन्च केली आहेत.
सीबीएसईकडून सुरू करण्यात आलेल्या कॉमिक पुस्तकांचा उद्देश शाळकरी विद्यार्थ्यांमध्ये इन्कम टॅक्सचे महत्त्व आणि जागरुकता आहे. त्याने शाळकरी मुलांना भविष्यात इन्कम टॅक्सचे महत्त्व कळेल.

सीबीएसईने इंग्रजीसह हिंदी, तेलगू, तामिळ आणि गुजराती या पाच भाषांमध्ये प्रकाशित केले आहे. सीबीएसईच्या अधिकृत अधिसूचनेनुसार, शालेय विद्यार्थ्यांना आयकराबद्दल जागरूक करण्याच्या उद्देशाने सर्व शाळांना ही पुस्तके विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांसोबत शेअर करण्याच्या सूचना जारी करण्यात आल्या आहेत.
- मोटू पतलू कानून का पालन करना
- हमारा भारत महान
- मोटू पतलू साथ मिलकर आगे बढ़ना
- मोटू पतलू और ऑनलाइन लाइफ
- मोटू पतलू डर के आगे जीत
- मोटू पतलू इनकम टैक्स की कहानी
- मोटू पतलू टैक्स परी
- मोटू पतलू पैन कार्ड की कहानी



























































