
‘मुंबई बॉम्बस्फोटाचा सूत्रधार, कुख्यात तस्कर दाऊद इब्राहिम हा दहशतवादी नाही, त्याने मुंबईत बॉम्बस्फोटही घडवले नाहीत…’ असे दिव्य विचार महामंडलेश्वर ममता कुलकर्णीने व्यक्त केले आहेत. मी कधीही दाऊदला भेटले नव्हते, अशी मखलाशीही तिने केली.
काही महिन्यांपूर्वी झालेल्या कुंभमेळ्यात किन्नर आखाड्याची महामंडलेश्वर बनलेली अभिनेत्री ममता कुलकर्णी सध्या गोरखपूरच्या दौर्यावर आहे. गोरखनाथ मंदिरात दर्शन घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना तिने हे दिव्य विचार मांडले. अंडरवर्ल्ड डॉन, मुंबईत बॉम्बस्फोट घडवून पाकिस्तानात पळालेला कुख्यात तस्कर दाऊद इब्राहिम हा दहशतवादी नसून त्याने बॉम्बस्फोटही घडवले नाहीत, असा दावा तिने केला. मी आता पूर्ण अध्यात्माकडे वळली असून माझा राजकारण किंवा चित्रपट उद्योगाशी संबंध नसल्याचेही ती म्हणाली.
 
             
		





































 
     
    





















