
दिल्ली पोलिसांनी इसीसीच्या दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश केल्यानंतर आता राजस्थानमधील जोधपूर आणि जैसलमेर येथे एटीएस आणि आयबीने छापेमारी केली आहे. एटीएस आणि आयबीने केलेल्या संयुक्त कारवाईत तीन संशयित दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. दोघांना जोधपूर, तर एकाला जैसलमेर येथून बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. अटक करण्यात आलेल्या संशयित दहशतवाद्यांवर आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनांशी संपर्क ठेवल्याचा आणि फंडिंग नेटवर्क उभारल्याचा आरोप आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एटीएस आणि आयबीने शुक्रवारी राजस्थानमधील अनेक ठिकाणी छापेमारी केली. दहशतवादी कारवायासंबंधी ही छापेमारी करण्यात आली असून तिघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून काही आपत्तीजनक सामग्रही जप्त करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे याआधी दिल्लीतही पोलिसांच्या विशेष पथकाने दहशतवाद्यांविरुद्ध धडक कारवाई करत अदनान खान याच्यासह अन्य काही जणांना अटक केली होती. त्यानंतर राजस्थानमध्येही अशीच कारवाई झाल्याने सुरक्षा दलाला मोठा दहशतवादी कट उधळण्यात यश आले आहे.
ISIS module busted in Delhi – दिल्लीत बॉम्बस्फोटाचा मोठा कट उधळला; ISIS च्या दोन दहशतवाद्यांना अटक
 
             
		





































 
     
    



















