अल्पवयीन मुलाला यकृत दान करण्याची परवानगी द्या! केईएम रुग्णालयाला हायकोर्टाचे आदेश

court

अॅक्यूट – ऑन – क्रॉनिक लिव्हर फेल्युअर या यकृताच्या आजारामुळे यकृत निकामी झाले असून यकृत प्रत्यारोपणासाठी अल्पवयीन पुतण्याला यकृत दान करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी करत एका रुग्णाने हायकोर्टात धाव घेतली आहे. न्यायालयाने या याचिकेची गंभीर दखल घेत केईएम रुग्णालयाच्या प्राधिकृत समितीला याचिकाकर्त्यांच्या अर्जावर तत्काळ निर्णय घेण्याचे आदेश न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांच्या एकलपीठाने दिले आहेत.