
अहिल्यानगर येथून आलेल्या अजिज मोमीन या शिवसेनेच्या मुस्लिम मावळ्याने ‘गेलं रे गेलं, आमचं मत चोरीला गेलं’ अशी जोरदार घोषणाबाजी केली. त्याने परिधान केलेल्या बॅनरनेदेखील सर्वांचे लक्ष वेधले. महायुती सरकार म्हणजे सर्वसामान्य जनतेच्या मतांची चोरी करणारे खरे देशद्रोही आहेत, त्यांनी गद्दारी करून आमच्या शिवसेनेचे नाव आणि चिन्ह चोरले. पक्षप्रमुखांनी आदेश दिल्यास आम्ही रस्त्यावर उतरून आर या पारची लढाई लढू, पण या गद्दारांना धडा शिकवू, असा इशारा मोमीन यांनी दिला.




























































