वायू प्रदूषण हे सायलेंट महामारी, कोरोनापेक्षा जास्त लोकांचा मृत्यू!

दिवाळीनंतर दिल्ली-एनसीआरसह देशातील अनेक शहरांमध्ये वायू प्रदूषणात कमालीची वाढ झाली आहे. वायू प्रदुषणामुळे श्वसनासह अनेक गंभीर आजार होत असून, हे एका प्रकारे ‘सायलंट महामारीच’ आहे. कोरोनापेक्षाही जास्त मृत्यू वायू प्रदूषणामुळे होत आहेत. 2024 मध्ये जगभरात तब्बल 81 लाख लोकांचा मृत्यू या प्रदूषणामुळे झाला अशी धक्कादायक माहिती ‘एम्स’चे माजी संचालक रणदीप गुलेरिया यांनी दिली. वायू प्रदुषण हे मुक मारेकरी असून, हळूहळू लोकांचा जीव घेत आहे. वायू प्रदुषणाचे संकट केवळ श्वसनाच्या, फुफ्फुसाच्या आजारापुरते मर्यादीत राहिले नाही तर संपूर्ण शरीरावर गंभीर परिणाम होत आहेत. त्यामुळे वायू प्रदुषण रोखण्यासाठी ठोस उपाययोजना तातडीने केल्या पाहिजेत, असे डॉ. गुलेरिया यांनी सांगितले.