
स्मार्टवॉचमुळे एकाचा जीव वाचल्याची घटना उघड झाली आहे. मध्य प्रदेशातील एका व्यक्तीने अॅपल वॉचच्या या फीचरचे आभार मानले आहेत. साहिल (26) असे या व्यक्तीचे नाव आहे. वॉचने साहिलला वेळेवर अलर्ट दिला आणि रुग्णालयात दाखल झाल्यामुळे त्याचा जीव वाचला. साहिल गेल्या आठवड्यात व्यवसायासाठी जबलपूरला गेला होता आणि ट्रेनने परतणार होता. त्याआधी एका बिझनेस मीटिंगनंतर तो चित्रपट पाहण्यासाठी गेला होता. त्यावेळी स्माटवॉचने त्याच्या हार्ट रेटबद्दल अलर्ट दिले. त्याने अचानक वाढलेल्या हार्ट रेटकडे दुर्लक्ष केले नाही. ईसीजी, ब्लड टेस्ट करण्यात आली. साहिलचे ब्लड प्रेशर 180/120 होते. डॉक्टरांनी त्याला सांगितले की, ट्रेन प्रवासादरम्यान त्याला स्ट्रोक किंवा ब्रेन हॅमरेज होण्याची शक्यता होती. मात्र स्मार्टवॉचमुळे त्याचा जीव वाचला.



























































