
‘ट्रजेडी क्वीन’ मीना कुमारी यांच्या आयुष्यावर चित्रपट येणार आहे. फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा सिनेमा बनवणार आहे. या सिनेमात मीना कुमारींची भूमिका साकारण्यासाठी अभिनेत्री कियारा अडवाणीचे नाव निश्चित झाल्याची चर्चा रंगली आहे.
काही महिन्यांपूर्वीच कियाराने लेकीला जन्म दिला. आई झाल्यानंतर तिने आपला पहिला सिनेमा साईन केला असल्याचे समजते. निर्माते बिलाल अमरोही यांच्या या सिनेमात मीना कुमारी आणि त्यांचे पती कमल अमरोही यांची कहाणी दाखवण्यात येणार आहे. कमल अमरोही यांनी 1972 साली ‘पाकिजा’ सिनेमा बनवला होता.
मीना कुमारी यांच्या भूमिकेसाठी कियारा घरीच तयारी करत असून उर्दूही शिकत आहे. या भूमिकेसाठी आधी क्रिती सेनन हिच्या नावाचीही चर्चा होती. मात्र मीना कुमारी यांच्या बायोपिकसाठी कियारा अडवाणीने बाजी मारली आहे. अद्याप यावर अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. माहिती समोर आलेली नाही.




























































