
क्रिकेटमध्ये काही खेळाडू असतात जे फटके मारत नाहीत, तर आपल्या नजाकतीने खेळ रंगवतात. त्यातलाच एक. रविवारचा दिवस म्हणजे जणू एक सोज्वळ संगीत संपल्यासारखे वाटले. कारण न्यूझीलंडच्या या सज्जन आणि शांत फलंदाजाने तुफान फटकेबाजीच्या टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून आपली निवृत्ती जाहीर केली. बराच काळ चाललेल्या चर्चेला अखेर पूर्णविराम विल्यमसनने दिला.
आता मी फक्त दोन क्रिकेटमधे आपली क्रिकेट कला सादर करीन. टेस्ट आणि वन डे. विल्यमसनचे क्रिकेट संपलेले नाही. त्याचा नजाकतभरा खेळ पुढेही पाहायला मिळेल. 2011 मध्ये पदार्पण करणाऱ्या केनने 93 टी-20 सामन्यांत 2575 धावा केल्या. यात 18 अर्धशतके आणि 95 धावांची सर्वोत्तम खेळी. हे आकडे सांगतात की, तो ब्रेक घेतोय, पण ‘थकलो’ असे अजिबात नाही. 75 सामन्यांत न्यूझीलंडचं नेतृत्व करत त्याने 2016 आणि 2022 मध्ये संघाला उपांत्य फेरी तर 2021 मध्ये अंतिम फेरी गाठून दिली.



























































