निवडणूक आयोगाने जनतेच्या भावनांची दखल घेतली नाही, अंबादास दानवे यांची टीका

निवडणूक आयोगाने जनतेच्या भावनांची दखल घेतली नाही, अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी राज्य निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेवर केली आहे. माध्यमांशी संवाद साधताना ते असं म्हणाले आहेत.

अंबादास दानवे म्हणाले आहेत की, “निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असला तरी, निवडणूक आयोगाने जनतेचा रेटा आणि भावनांची दखल घेतली नाही. दुबार मतदारांबाबत निवडणूक आयोगाने केलेला खुलासा समर्थनीय नाही. नावे स्टार करत असतील तर तुम्हाला दुबार नावे माहीत आहेत ती गाळून टाका मग. यात मतदाराला विचारण्याची गरज नाही, जिथे मतदार राहतो तिथे त्याचे नाव असावे, आणि जिथे नाव नाही ते नाव गाळून टाकले पाहिजे.”