नेपाळमध्ये हिमस्खलनात 7 गिर्यारोहकांचा मृत्यू

नेपाळमधील यालुंग री शिखरावर हिमस्खलन झाल्याने सात जणांचा मृत्यू झाला असून चार जण जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडली. मृतांमध्ये तीन अमेरिकन, एक कॅनेडियन, एक इटालियन आणि दोन नेपाळी नागरिकांचा समावेश आहे. 15 जणांचे पथक गौरीशंकर आणि यालुंग रीकडे जात होते.