खेळण्याआधीच अश्विनने गुडघे टेकले

हिंदुस्थानी फिरकीपटू रविचंद्रन अश्विन बीबीएलमध्ये खेळणार असल्याची चांगलीच हवा निर्माण झाली होती. पण त्याआधीच अश्विनच्या गुडघ्याच्या संपूर्ण बिग बॅश लीग हंगामातून बाहेर पडले आहेत. हा निर्णय सिडनी थंडर संघासाठी मोठा धक्का मानला जातो. आयपीएलमधून निवृत्ती घेतल्यानंतर अश्विनने थंडरकडून पूर्ण हंगामासाठी करार केला होता. सुरुवातीला त्याला केवळ 3-4 सामने खेळायचे होते, परंतु बीबीएल लिलावात अनसोल्ड राहिल्यानंतर त्याने संपूर्ण हंगाम खेळण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे तो बिग बॅश लीगमधील एक हाय प्रोफाईल खेळाडू ठरणार होता. मात्र दुखापतीमुळे आता त्याला थंडरकडून पदार्पणासाठी आणखी एक वर्ष थांबावे लागणार आहे.