
बऱ्याचदा शूज वापरताना सॉक्समधून दुर्गंधी येते. यामुळे बाजूला बसलेल्या व्यक्तीला त्रास होतो. जर सॉक्सची दुर्गंधी टाळायची असेल तर काही टिप्स आहेत. सर्वात आधी मोजे घालण्यापूर्वी तुमचे पाय पूर्णपणे कोरडे असल्याची खात्री करा. कारण ओलावा दुर्गंधी निर्माण करणाऱ्या जिवाणूंच्या वाढीस मदत करतो. सॉक्स स्वच्छ आणि पूर्णपणे सुकलेले असतील याची खात्री करा. n रोज एक नवीन जोडी मोजे घाला आणि वापरलेले मोजे लगेच धुवा. शूज नियमितपणे स्वच्छ करा. घाण आणि धूळ ओलावा धरून ठेवू शकतात, ज्यामुळे बुरशी आणि दुर्गंधी वाढते. ओलावा शोषून घेण्यासाठी आणि जिवाणूंची वाढ रोखण्यासाठी शूजमध्ये अँटीफंगल फूट पावडर शिंपडा. शूज काढल्यावर त्यांना हवेत ठेवा जेणेकरून ते पूर्णपणे कोरडे होतील.


























































