प्रदूषण रोखण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल, दिल्लीत 22 लाख मुलांची फुप्फुसे खराब

देशभरात वायू प्रदूषण वाढले असून याला रोखणे अत्यंत गरजेचे आहे, असे सांगत वायू प्रदूषण करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. ल्यूक क्रिस्टोफर कौटिन्हो यांनी ही याचिका दाखल केली असून याचिकेत म्हटले आहे की, एकटय़ा दिल्लीत जवळपास 22 लाख मुलांच्या फुप्फुसांचे नुकसान झाले आहे. ही फुप्फुसे बरे होण्याच्या पलीकडे गेली आहेत. त्यामुळे दिल्लीसह देशातील वाढते वायू प्रदूषण रोखणे गरजेचे आहे. ल्यूक क्रिस्टोफर कौटिन्हो यांनी दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे की, दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नई आणि बंगळुरूमध्ये पीएम 2.5 आणि पीएम 10 सारखे प्रदूषक मर्यादेपेक्षा जास्त आहेत. पीएम 2.5 साठी वार्षिक सरासरी 40 मायक्रोग्राम प्रति घनमीटर आणि पीएम 10 साठी 60 मायक्रोग्राम प्रति घनमीटर आहे. धोरणे असूनही ग्रामीण आणि शहरी भारतातील मोठय़ा भागांमध्ये हवेची गुणवत्ता खराब आहे व अनेक प्रकरणांमध्ये ती आणखी वाईट आहे. दिल्लीमध्ये पीएम 2.5 ची पातळी जी भारतीय मानकांचे उल्लंघन आहे.