
आपल्याला थंड पाणी पिणे आवडते कारण ते आपली तहान भागवते. परंतु खूप थंड पाणी पिणे हे आपल्या आरोग्यासाठी हे धोकादायक असते. फ्रीजमधली पाण्याची बाटली काढून तोंडाला लावत असाल तर ही सवय आता बदला. या सवयीचे तुमच्या आरोग्यावर खूप वाईट परीणाम होतात.
अधिक प्रमाणात थंड पाणी पिल्याने पचन मंदावते. हे दीर्घकाळ चालू राहिले तर गॅस आणि पोटात तीव्र पेटके यासारख्या समस्या उद्भवू शकतात.
वारंवार खूप थंड पाणी पिल्याने तुमच्या शरीराचे तापमान कमी होते. जेव्हा असे होते तेव्हा तुमचे शरीर ते गरम करण्यासाठी आणखी जास्त ऊर्जा खर्च करते. हे वजन वाढण्याचे एक मोठे आणि महत्त्वाचे कारण असू शकते.
आरोग्य तज्ञांचा असा विश्वास आहे की जेव्हा तुम्ही खूप थंड पाणी पिता तेव्हा आपल्या रक्तवाहिन्या आकुंचन पावतात. यामुळे शरीरातील रक्ताभिसरण विस्कळीत होऊ शकते.
वारंवार खूप थंड पाणी पिल्याने मेंदूतील नसा उत्तेजित करतात. कधीकधी यामुळे तीव्र डोकेदुखी आणि मायग्रेन देखील होतो.

























































