नोबेल प्राइझ डायलॉगमध्ये दिग्गजांचा सहभाग

टाटा ट्रस्टच्या सहयोगाने आयोजित केलेल्या नोबेल प्राइझ डायलॉग इंडिया 2025 मध्ये नोबेल पुरस्कार विजेते, आघाडीचे शास्त्रज्ञ व विचारवंत आणि इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स, बंगळुरूमधील विद्यार्थी आदी दिग्गजांनी सहभाग नोंदवला. टाटा ट्रस्टचे सीईओ सिद्धार्थ शर्मा म्हणाले, ‘नोबेल प्राइझ आऊटरीचसोबत आमचा सहयोग समान विश्वासातून करण्यात आला, तो म्हणजे ज्ञानाचा वापर मानवतेच्या सेवेसाठी केला पाहिजे.