
हिंदुस्थानी चित्रपटाला देशाबाहेरही चांगली पसंती मिळत आहे. मागील पाच वर्षांत ऑस्ट्रेलियातील बॉक्स ऑफिसवर हिंदुस्थानी चित्रपटांनी आपला ठसा उमटवला आहे. 2021 मध्ये ऑस्ट्रेलियात हिंदुस्थानी चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर 1.3 कोटी ऑस्ट्रेलिया डॉलर म्हणजेच 75 कोटी रुपयांची कमाई केली आहे. 2025 च्या अखेरपर्यंत ही कमाई 2.5 कोटी डॉलर म्हणजेच 143 कोटी रुपये असण्याचा अंदाज आहे. अमेरिका, ब्रिटन नंतर ऑस्ट्रेलियात हिंदुस्थानी चित्रपटाला सर्वात जास्त पाहिले जाते. हिंदुस्थानी चित्रपटाच्या एकूण बॉक्स ऑफिसची कमाई जवळपास 38 टक्के हिंदी भाषेतून आला आहे. यात सैयारा, छावा हे दोन चित्रपट हिट ठरले. यानंतर पंजाबी चित्रपटाचे योगदान 16 टक्के आणि मल्याळी चित्रपटाची कमाई 14 टक्के होती.


























































