
रेल्वेत नोकरी करणाऱयासाठी सुवर्णसंधी आहे. रेल्वेने ज्युनियर इंजिनीअर, डेपो मटेरियल सुपरिटेंडंट, केमिकल आणि मेटलर्जिकल असिस्टंट या पदांच्या एकूण 2 हजार 569 जागांसाठी भरती आयोजित केली आहे. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी अखेरची तारीख 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे इंजिनीअरिंग डिप्लोमा असणे आवश्यक आहे. या भरतीसंबंधी माहिती रेल्वेची वेबसाईट https://www.rrbmumbai.gov.in वर माहिती देण्यात आली आहे.

























































