आता बाजारातील महागड्या टोनरना करा बाय बाय, घरीच बनवा नैसर्गिक टोनर, जाणून घ्या

निरोगी आणि चमकदार त्वचा मिळविण्यासाठी, आपण विविध फेस वॉश, क्रीम, सीरम आणि टोनर वापरतो. परंतु कधीकधी, या उत्पादनांचा अतिरेक झाल्याने, त्वचेला नुकसान पोहोचते. या सर्व समस्या टाळण्यासाठी आपण घरच्या घरी टोनर करणे हितावह आहे.

दररोज एक चमचा तूप खा; जेवणाची चव वाढेल आणि आरोग्यासाठी देखील उत्तम

घरगुती तांदळाचा टोनर
तांदळाचा टोनर बनवणे खूप सोपे आणि बजेटला अनुकूल आहे. हे टोनर त्वचेला उजळ आणि मऊ मुलायम करते. यामुळे त्वचेचा पोतही सुधारतो. याकरता अर्धा कप तांदूळ पूर्णपणे धुवा आणि दुप्पट पाण्यात ४-५ तास भिजवा. पाणी गाळून घ्या आणि स्प्रे बाटलीत घाला. क्लीन्सरने चेहरा स्वच्छ केल्यानंतर दररोज सकाळी आणि संध्याकाळी ते लावा.

घरगुती गुलाबजल टोनर
गुलाबजल टोनर बनवण्यासाठी, ताज्या गुलाबाच्या पाकळ्या पाण्यात उकळा. पाणी गाळून घ्या, पाणी वेगळे करा आणि ते स्प्रे बाटलीत ओता. झोपण्यापूर्वी दररोज ते चेहऱ्यावर लावावे. यामुळे त्वचा उजळ होईल आणि डाग दूर होतील. गुलाबजल टोनर लावल्याने तुमची त्वचा हायड्रेट राहते. तसेच यामुळे चेहऱ्यावर चमक आणि ताजेपणा येण्यास मदत होते.

हिवाळ्यात ही फळे खा आणि निरोगी राहा

घरगुती ग्रीन टी टोनर
हे तयार करण्यासाठी, एका कप पाण्यात ग्रीन टी टोनर घाला आणि ते उकळवा. थंड झाल्यावर, गाळून घ्या आणि स्प्रे बाटलीत घाला. झोपण्यापूर्वी चेहरा धुतल्यानंतर दररोज सकाळी आणि रात्री ते लावा. ग्रीन टी टोनर त्वचेला खोलवर स्वच्छ करतो, ती तेलमुक्त ठेवतो. ग्रीन टीमधील अँटीऑक्सिडंट्स त्वचेला आतून दुरुस्त करतात.

घरगुती संत्र्याचा टोनर
संत्र्याच्या साली उन्हात वाळवा. आता, एक कप गरम पाण्यात संत्र्याची पावडर घाला, उकळवा. थंड झाल्यावर, गाळून घ्या आणि स्प्रे बाटलीत भरा. संत्र्यांमधील व्हिटॅमिन सी त्वचेला उजळ करण्यास मदत करते. नियमित वापरामुळे निस्तेजपणा आणि टॅनिंग देखील कमी होते आणि त्वचा ताजी होते.

दररोज एक टोमॅटो खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे

घरगुती कोरफड टोनर
कोरफड टोनर बनवण्यासाठी, अर्धा कप पाण्यात एक चमचा कोरफड जेल आणि गुलाबजल घाला आणि रेफ्रिजरेटरमध्ये ठेवा. कोरफड त्वचेला थंड करतो आणि मॉइश्चरायझ करतो. कापसाने किंवा स्प्रे बाटलीच्या साह्यायने हा टोनर चेहऱ्यावर लावता येईल.

घरगुती काकडी टोनर
आपण घरी काकडीचे टोनर सहजपणे बनवू शकतो. काकडी सोलून त्याचे तुकडे करा आणि मिक्सर जारमध्ये बारीक करा. पेस्टचा रस गाळून स्वच्छ स्प्रे बाटलीत काढावा.

दररोज सकाळी रिकाम्या पोटी वेलची खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे

टोनरचे फायदे
नियमितपणे टोनर लावल्याने त्वचेला नैसर्गिक चमक मिळते.
टोनर त्वचेचे छिद्र घट्ट करतो, यामुळे चेहरा गुळगुळीत आणि मऊ मुलायम दिसतो.

टोनरचा नियमित वापर केल्याने त्वचेचा रंग उजळतो आणि दिवसभर त्वचा ताजी राहते.

हिवाळ्यात चहामध्ये आलं का घालायला हवं, जाणून घ्या

घरी टोनर बनवण्याचे काय फायदे आहेत?

घरी टोनर बनवल्यास, त्वचेला कोणत्याही प्रकारे हानी पोहोचत नाही. मुख्य म्हणजे आपण आपल्या त्वचेच्या प्रकारानुसार टोनर तयार करू शकतो.

रोज टोनर वापरणे सुरक्षित आहे का?
घरी बनवलेले नैसर्गिक टोनर वापरल्याने त्वचेला कोणतेही नुकसान किंवा दुष्परिणाम होणार नाहीत. चेहरा पूर्णपणे स्वच्छ केल्यानंतर ते दररोज झोपण्यापूर्वी लावावे.

घरगुती टोनर कसा साठवायचा?
काचेच्या कंटेनर किंवा स्वच्छ स्प्रे बाटली वापरत असाल, तर टोनर बराच काळ सहज साठवता येतो. ताजे ठेवण्यासाठी, ते फ्रीजरमध्ये ठेवावे.