
पवई येथे उद्या, बुधवारी नवनाथ महोत्सव आयोजित केला आहे. यानिमित्त ‘अलख निरंजन’ या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून जाणार आहे.
पवईत साकी विहार रोड, एल.टी. गेट नंबर-1 येथे मुंबईतील पहिले नवनाथ मंदिर असून या मंदिरात मुंबईच्या कानाकोपऱ्यातून हजारो भक्त दर्शनासाठी येतात. मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त होणाऱ्या या महोत्सवात सकाळी 9 ते 11 या वेळेत विशेष पूजा विधी आणि दुपारी 12 वाजता नाथांची महाआरती होईल. यानंतर शिवसेना आमदार सुनील राऊत यांच्या प्रयत्नातून नवनाथ मंदिरासमोर उभारलेल्या सभामंडपाचे उद्घाटन होईल. दुपारी 12.30 ते 3 या काळात महाप्रसादाचे आयोजन केले आहे, अशी माहिती नवनाथ मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष, शिवसेना विक्रोळी विधानसभा संघटक धर्मनाथ पंत, नवज्योती मित्र मंडळाचे हरजितसिंह अहलुवालिया यांनी दिली.

























































