मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक विजय कुमार यांचे निधन

मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक विजय कुमार यांचे मंगळवारी सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. कुमार यांनी महिनाभरापूर्वीच महाव्यवस्थापक म्हणून पदभार स्वीकारला होता. त्यांना झोपेतच हृदयविकाराचा झटका आल्याचे सांगण्यात आले. ते 56 वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर बुधवारी सकाळी चंदनवाडी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
ते भारतीय रेल्वे सेवा यांत्रिकी अभियंताच्या 1988 च्या तुकडीतील अधिकारी होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे.