जपानला दोन लाख हिंदुस्थानींची भेट

हिंदुस्थानी पर्यटक जगातील अनेक भागांना भेटी देतात. या वर्षातील जानेवारी ते सप्टेंबरपर्यंत 2 लाख 30 हजार हिंदुस्थानी पर्यटकांनी जपानला भेट दिली आहे, अशी माहिती जपान पर्यटन एजन्सीने दिली. जपानला जाणाऱ्या हिंदुस्थानी पर्यटकांची मागील वर्षीच्या तुलनेत 37 टक्के वाढ झाली आहे. 2024 मध्ये एकूण अडीच लाख हिंदुस्थानी पर्यटकांनी जपान दौरा केला होता. हिंदुस्थानी पर्यटकांनी फिरण्यासाठी जपान देशाला पसंती दिल्याने जपान आणि हिंदुस्थान या दोन देशांतील संबंध अधिक दृढ होण्याला मदत मिळत आहे.