
Indian Premier League 2026 साठी सर्व संघांनी आतापासूनच जोरदार तयारीला सुरुवात केली आहे. मिनी लिलावापूर्वीच संघांनी काही खेळाडूंना करारमुक्त तर काही खेळाडूंना संघासोबत कायम ठेवलं आहे. याच दरम्यान कोलकाता नाईट रायडर्सने एक मोठी घोषणा केली असून जगातील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडूंपैकी एक असलेचा ऑस्ट्रेलियाचा दिग्गज माजी खेळाडू शेन वॉटसनला सहाय्यक प्रशिक्षक म्हणून नियुक्त केले आहे.
शेन वॉटसन आपल्या संयमी आणि आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जातो. त्याने अनेक सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाला एकहाती विजय मिळवून दिला आहे. तसेच अटीतटीच्या सामन्यांमध्ये त्याने आपल्या वेगवान गोलंदाजीच्या जोरावर हातातून निसटलेला सामना खेचून आणला आहे. ऑस्ट्रेलियाच्या वर्ल्ड कप विजेत्या संघाचा तो महत्त्वपूर्ण भाग राहिला आहे. तसेच आयपीएलमध्येही त्याने आपल्या खेळाची झलक यापूर्वी दाखवून दिली आहे. राजस्थान रॉयल्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि चेन्नई सुपर किंग्ज या संघांकडून त्याने धुवांधार खेळाचे प्रदर्शन केले आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर त्याने प्रशिक्षक म्हणून आपल्या नव्या प्रवासाला सुरूवात केली. दिल्ली कॅपिटल्स संघासोबत त्याने आपल्या प्रशिक्षणाचा आयपीएलमध्ये श्री गणेशा केला होता. आता कोलकाता नाईट राडडर्स संघाच्या सहाय्यक प्रशिक्षकाच्या भुमिकेत शेन वॉटसन चाहत्यांना दिसणार आहे.
शेट वॉटसनने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीमध्ये कसोटीमध्ये 59, वनडेमध्ये 190 आणि टी20 मध्ये 58 सामने खेळले आहेत. तसेच आयपीएलमध्ये 145 सामने त्याने खेळले असून 30.99 च्या सरासरीने 3874 धावा चोपून काढल्या आहेत. त्याचबरोबर 92 फलंदाजांना त्याने तंबुचा रस्ता दाखवला आहे.




























































