आदिक पेंशन वाद; डॉ. पाठकांना अटकपूर्व जामीन

माजी उपमुख्यमंत्री रामराव आदिक यांची पेंशन लाटल्याचा आरोप असलेल्या डॉ. लिखा पाठक यांना सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला. आदिक यांच्या मुलाने डॉ. पाठक यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. आदिक यांच्या निधनानंतर डॉ. पाठक यांनी खोटी कागदपत्रे सादर केली. आदिक हे विवाहित होते. तरीही आदिक यांची पत्नी असल्याचे सांगून डॉ. पाठक यांनी त्यांची कुटुंब पेंशन लाटली, असा आरोप करण्यात आला. यात होणारी अटक टाळण्यासाठी डॉ. पाठक यांनी अर्ज केला होता.