नेक्स्टजेन टेबल टेनिस लीग खेळाडूंचा लिलाव आज

नेक्स्टजेन स्पोर्ट्स इन्जा नेक्स्टजेन टेबल टेनिस लीगची पहिली आवृत्ती 6 व 7 डिसेंबर 2025 रोजी विलेपार्ले येथील प्रबोधनकार ठाकरे संकुल, टेबल टेनिस हॉल येथे आयोजित करण्यात आली आहे. त्या लीगसाठी खेळाडूंचा लिलाव शुक्रवारी  होणार आहे. संघमालक त्यांचे प्रशिक्षक आणि मार्गदर्शक खेळाडूंच्या लिलावाद्वारे त्यांचे संघ निवडतील. 12 ते 60 वर्षे वयोगटातील खेळाडूंसाठीच्या या अनोख्या स्पर्धेचे इन्जा वेलनेस हे शीर्षक प्रायोजक आहेत आणि हॅपी फाऊंडेशन ही एनजीओ  भागीदार आहे. या स्पर्धेत सब ज्युनियर (15 वर्षांखालील) मुले, ज्युनियर (19 वर्षांखालील) मुले आणि मुली, महिला, पुरुष आणि पुरुष वेटरन्स (40+) अशा वेगवेगळय़ा श्रेणींमध्ये सहा खेळाडूंचा समावेश असलेले एकूण 12 संघ आकर्षक ट्रॉफीसह एक लाख रुपयांच्या बक्षिसासाठी लढतील. उपविजेत्या संघाला 50 हजार रुपयांचे बक्षीस मिळेल. उपांत्य फेरीतील दोन्ही संघांना प्रत्येकी 25,000 रुपयांचे रोख बक्षीस मिळेल. याशिवाय वैयक्तिक बक्षिसेही ठेवण्यात आली आहेत.