
जैन मुनी नीलेश चंद्र यांच्या पुढाकारातून स्थापन करण्यात आलेल्या जन कल्याण पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी हार्दिक हुंडिया यांची निवड करण्यात आली आहे. सुशासनाचा अजेंडा घेऊन आमचा पक्ष देशात काम करेल, असे हुंडिया यांनी सांगितले.
हार्दिक हुंडिया हे ज्येष्ठ पत्रकार असून ‘हिरा माणेक’ या साप्ताहिकाचे व्यवस्थापकीय संचालक आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून ते सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत.

























































