
ज्येष्ठ शिवसैनिक गोपाळ पुजारी (88) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, मुलगी, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. शिवसेनेच्या स्थापनेच्या काळात गोपाळ पुजारी यांनी गिरगाव येथे शिवसेना नेते प्रमोद नवलकर यांच्यासोबत काम केले. त्यानंतर ते जोगेश्वरी (पूर्व) येथे स्थायिक झाले. ज्येष्ठ नगरसेवक राजेश्वर रागिनवार, तत्कालीन शाखाप्रमुख दिगंबर म्हसकर, देविदास साळसिंगीकर यांच्यासोबत शिवसेनेच्या विस्ताराचे काम केले. शिवसेनेच्या प्रत्येक आंदोलनात ते सहभागी असत. त्यांच्या निधनामुळे कडवट व निष्ठावंत शिवसैनिक हरपला, अशी हळहळ व्यक्त होत आहे.

























































