
अहमदपूर तालुक्यातील हडोळती टोल नाक्या पासून एक किमी अंतरावर गुरुवारी रात्री साडे आठच्या सुमारास दुचाकीला जोराची धडक दिली. या अपघातात दुचाकी वरील दोन्ही तरुणांचा जागीच मृत्यू झाला.
सदर कार नायगांव वरून लातुरकडे जात होती. दुचाकीस्वार पुण्याला कामाला निघाले होते. हडोळती पासून 1 किमी अंतरावर जगळपूर कॉर्नर जवळ रात्री 8.30 वाजता या कारने दुचाकीला समोरा समोर धडक दिली. या अपघातात दुचाकी वरील माधव गुलाब लोहगावे (24) व संतोष संभाजी चिंतले (20) दोघेही यांचा जागीच मृत्यू झाला. कार चालक गाडी सोडून फरार झाला असून घटनास्थळी पोलीस उशीरा पोहचले असे स्थानिकांनी सांगितले. ही कार नायगांव येथील असल्याचे समजते. मृतदेह रात्री प्राथमिक आरोग्य केंद्र हडोळती येथे शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत .


























































