पाचवीपर्यंतचे वर्ग गुरुग्राममध्येही ऑनलाइन

दिल्ली शहरापाठोपाठ आता गुरुग्राममध्येही पाचवीपर्यंतच्या शाळांना हायब्रीड मोडमध्ये चालवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे आता दिल्ली एनसीआरमधील हवेच्या खराब गुणवत्तेमुळे पाचवीपर्यंतच्या शाळा बंद करण्यात आल्या असून वर्ग मात्र ऑनलाईन सुरू ठेवले जाणार आहेत. मुलांच्या आरोग्य आणि सुरक्षिततेसाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे उपायुक्त अजय कुमार यांनी सांगितले. दिल्ली एनसीआरमध्ये प्रदूषणाची पातळी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. केंद्र सरकारने ग्रेडेड रिस्पॉन्स अॅक्शन प्लॅन (ग्रेप) चा टप्पा 3 लागू केला. दिल्लीतील रहिवाशांना घरातच राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.