
रशियाचे लढाऊ विमान सू-30 ला प्रशिक्षणादरम्यान अपघात झाला. हा अपघात फिनलँडच्या सीमेजवळ झाला असून यात दोन पायलटचा मृत्यू झाला आहे. हे लढाऊ विमान नियमित प्रशिक्षणासाठी उड्डाण करत होते. विमानात कोणत्याही प्रकारचे शस्त्र नव्हते. ज्या ठिकाणी हे विमान कोसळले, त्या ठिकाणी कोणतीही जीवितहानी झाली नाही, असे रशियाच्या संरक्षण विभागाकडून सांगण्यात आले आहे. या दुर्घटनेची माहिती मिळताच अधिकाऱयांनी दुर्घटनास्थळी आपत्कालीन सेवा पाठवली, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.



























































