
अंधेरीतील गुंदवली मेट्रो स्थानकाच्या पहिल्या मजल्यावर एक बेवारस बॅग सापडल्याने खळबळ उडाली आहे. मेट्रो स्थानकावरील पोलिसांनी श्वानपथक व बॉम्बशोधक पथकाला पाचारण केले आहे. स्थानकावरील प्रवाशांना पोलिसांनी स्थानकाबाहेर काढले आहे.
दिल्लीतील भीषण बॉम्बस्फोटानंतर मुंबईत हाय अॅलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबई पोलिसांकडून सुरक्षेची विशेष काळजी घेतली जात आहे. असे असताना आज सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस बस डेपोतील एका स्टॉपवर बेवारस लाल बॅग आढळून आली. होती. मात्र पोलिसांनी केलेल्या तपासाअंती त्या बॅगेत कपडे व कागदपत्रे मिळून आल्यानंतर सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला.




























































