
भाजप ओबीसी शहराध्यक्ष अमित विलणकर यांनी आपल्या सोबतच्या तब्बल दिडशे निष्ठावान कार्यकर्त्यांसह शनिवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीर प्रवेश केला.त्यामुळे भाजपला निवडणुकीत जबरदस्त धक्का बसेल. यामुळे शहरातील राजकीय समीकरणांना नवी दिशा मिळाली असून शिवसेनेच्या संघटनात्मक बळात महत्त्वाची भर पडली आहे.
कार्यक्रमाला पक्षाचे उपनेते व माजी आमदार बाळ माने, तालुकाध्यक्ष शेखर घोसाळे, माजी शहर प्रमुख प्रमोद शेरे, शहराध्यक्ष प्रशांत साळुंखे तसेच विविध विभागांचे पदाधिकारी उपस्थित होते. सर्वांचे शिवबंधन बांधून उत्साहात स्वागत करण्यात आले. उपस्थित कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी आणि जल्लोषातून आपला उत्साह व्यक्त केला.
एकजुटीने लढूया- बाळ माने
या प्रसंगी उपनेते बाळ माने यांनी नवीन प्रवेश केलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. त्यांनी सांगितले की, “जनतेच्या प्रश्नांसाठी, स्थानिक विकासासाठी आणि न्यायाच्या लढ्यासाठी एकजुटीने लढण्याची ही वेळ आहे.” त्यांनी शिवसेनेच्या विचारधारेबद्दल आणि जनआस्थेबद्दल मार्गदर्शन केले.

























































