
हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीनिमित्त त्यांना वरळी विभागातील शिवसैनिकांनी अनोखी आदरांजली वाहिली आहे. सलग 155 महिने 17 तारखेला रक्तदान शिबिराचा कार्ययज्ञ सुरू ठेवण्यात आला आहे. सोमवारी शिवसेनाप्रमुखांच्या स्मृतिदिनी सकाळी 8 ते रात्री 9 या वेळेत शिवतीर्थ स्मृतिशक्तिस्थळाशेजारी शिवाजी पार्प नागरिक संघ हॉल येथे रक्तदान शिबीर आयोजित केले आहे.
17 नोव्हेंबर 2012 रोजी हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे महानिर्वाण झाले. त्या दिवसाच्या स्मृतीनिमित्त पुढच्या महिन्यात 17 डिसेंबर 2012 पासून रक्तदान शिबीर सुरू करण्यात आले. तेव्हापासून मागील 13 वर्षे सलग 155 महिन्यांच्या 17 तारखेला रक्तदान शिबिराचा कार्ययज्ञ सुरू ठेवण्यात आला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनानुसार रक्तदान शिबिराचे प्रत्येक महिन्यात अखंडित आयोजन केले जात आहे. शिवसेनाप्रमुखांवर निस्सीम श्रद्धा ठेवणारे असंख्य शिवसैनिक आणि रक्तदाते शिबिरामध्ये सहभागी होऊन उत्स्फूर्तपणे रक्तदान करतात. सोमवारी गोरेगाव-प्रबोधन येथील मीनाताई ठाकरे रक्तपेढीच्या सहकार्याने रक्तदान शिबीर पार पडणार आहे. इच्छुक रक्तदाते, शिवसैनिकांनी वरळी नाका येथील निष्ठावंत शिवसैनिक अरविंद भोसले यांच्याशी मोबाईल क्रमांक- 9821581860 यावर संपर्प साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
शिवसेना वर्सोवा विधानसभा शाखा क्र. 60 च्या वतीने ‘लोटस आय हॉस्पिटल’च्या सहाय्याने व उपविभागप्रमुख राजेश शेटये, शाखाप्रमुख सिद्धेश चाचे, महिला शाखासंघटक अश्विनी खानविलकर यांच्या पुढाकाराने आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन केले होते. शिबिराचा विभागातील 185 नागरिकांनी लाभ घेतला. यावेळी आमदार हारून खान, उपनेते अमोल कीर्तिकर, उद्योजक रमेश पिंपळे, महिला विभाग संघटक अनिता बागवे, विधानसभा संघटक शैलेश फणसे, मेघना काकडे, बाळा आंबेरकर, शीतल सावंत, दयानंद सावंत, सुप्रिया चव्हाण, सुचिता सावंत, गीता कदम, सचिन आंबेकर, निलेश देवकर, संजना हरळीकर, रसिका धामणकर, स्नेहल दळवी, शिवानी मोहिते, बब्बू चौधरी, रवि येरलकर आदी उपस्थित होते.
युवासेना बेळगावच्या वतीने यंदाही रक्तदान शिबिर आयोजित केले होते. यावेळी अनेक मराठी भाषिक, युवक, शिवसैनिकांनी रक्तदान करून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केले. युवासेना बेळगावचे जिल्हाप्रमुख विनायक हुलजी, सोमनाथ सावंत, वैभव कामत, मल्हार पावशे, महेश मजुकर, गौरांग गेंजी, ओमकार बैलूरकर, अमेश देसाई, प्रणव बेळगावकर, श्वेत तवनशेट्टी, अद्वैत चव्हाण पाटील, विद्येश बडसकर, सक्षम कांग्राळकर आदींनी उपक्रम यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली. शिबिरात शिवसेना संपर्कप्रमुख अरविंद नागनुरी व जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर यांच्या हस्ते छत्रपती शिवराय व बाळासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी राजपुमार बोकडे व महेश टंकसाळी उपस्थित होते.
शिवसेना शाखा क्र. 200च्या वतीने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. यावेळी विभागप्रमुख, आमदार महेश सावंत, निरीक्षक हरदीपसिंग लाली,सहनिरीक्षक सुरेश काळे, विश्वास निमकर, राकेश देशमुख, सुनिता आयरे, अॅड. रचना अग्रवाल, उर्मिला पांचाळ, प्रशांत घाडीगावकर, दत्ता घाटकर, नितीन पेडणेकर, निलेश बडदे, समीर दळवी, वंदना मोरे, अभिषेक बासुदकर, सचिन कदम, कल्पेश शहा उपस्थित होते.
शिववाहतूक सेनेने अनाथ मुलांना खाऊवाटप केले. शिवसेना उपनेते, शिव वाहतूक सेना अध्यक्ष भाऊ कोरगावकर, सरचिटणीस निलेश भोसले, कार्याध्यक्ष संदीप मोरे यांच्या सूचनेनुसार शिव वाहतूक सेना महाराष्ट्र कोषाध्यक्ष विनायक विश्वनाथ मुरुडकर, सचिव संदेश शिरसाट यांनी हा उपक्रम घेतला. याप्रसंगी राजाभाऊ झगडे, एकनाथ बोरसे, इम्रान ईद्रीसी, मुनाफ शेख, माया भाई, आरिफ भाई, सैद भाई, सचिन झगडे, शैलेंद्र खामकर उपस्थित होते.




























































