
एअर इंडिया दिल्लीहून थेट चीनच्या शांघायसाठी नॉन स्टॉप फ्लाईट सुरू करणार आहे. ही सेवा येत्या 1 फेब्रुवारी 2026पासून सुरू करणार आहे. एअर इंडिया अथॉरिटीने सोमवारी ही माहिती दिली. दिल्लीपाठोपाठ मुंबईहून थेट शांघायसाठी उड्डाण सुरू करण्याचा विचार आहे, असे एअर इंडियाने म्हटले आहे. एअर इंडियाची दिल्ली ते शांघायसाठी आठवड्यातील चार दिवस सेवा सुरू राहणार आहे. या उड्डाणासाठी बोइंग 787-98चा वापर केला जाणार आहे. या फ्लाईटमध्ये बिझनेस क्लाससाठी 19 फ्लॅट बेड सीट आणि इकोनॉमी क्लासची 238 सीट असतील. गलवान खोऱ्यात हिंदुस्थानी जवानांसोबत चीनच्या सैनिकांनी झडप घातली होती. यात हिंदुस्थानचे 20 जवान शहीद झाले होते. याचा निषेध म्हणून केंद्रातील मोदी सरकारने चीनच्या काही अॅप्सवर बंदी घातली होती. तसेच दोन्ही देशांमधील काही उड्डाण सेवा बंद केली होती.




























































