
छत्तीसगड, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या राज्यांच्या सीमेवरील दंडकारण्यावर एकेकाळी ज्याने राज्य केले आणि 500 पेक्षा जास्त जवानांचा बळी घेतला असा जहाल नक्षलवादी हिडमा माडवी याचा खात्मा करण्यात सुरक्षा दलांना यश आले आहे. मंगळवारी पहाटे सीमेजवळ झालेल्या कारवाईमध्ये हिडमा, त्याची पत्नी आणि अन्य चार नक्षलवाद्यांना ठार करण्यात आले. हिडमावर 10 कोटींपेक्षा जास्त बक्षीस ठेवले होते. तो किमान 25 हल्ल्यांचा सूत्रधार होता.




























































