अजितदादांच्या आमदारांची शेतकऱ्याला मारहाण

Ajit Pawar Faction MLA Dr. Kiran Lahamate Assaults Farmer Over Electricity Issues in Akole

वीज समस्येबाबत प्रश्न विचारण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याला अजित पवार गटाचे आमदार डॉ. किरण लहामटे यांनी मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. एकीकडे महायुतीचे सरकार ‘आम्ही शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही,’ असे सांगत आहे, तर दुसरीकडे त्यांचेच आमदार समस्या विचारणाऱया शेतकऱ्यांना मारहाण करत असल्यामुळे प्रचंड संताप व्यक्त होत आहे. अकोले तालुक्यातील लिंगदेव येथील शेतकरी वाळिबा होलगीर यांना आमदार लहामटे यांनी मारहाण केली. सोमवारी घडलेल्या घटनेचा आज गावकऱयांनी जाहीर निषेध नोंदविला. तर, ‘जोपर्यंत आमदार माफी मागणार नाहीत, तोपर्यंत त्यांना गावात पाऊल ठेवू देणार नाही,’ असा इशारा दिला आहे. यावेळी सरपंच अमित घोलप, जालिंदर कानवडे, देवराम फापाळे, बबनराव सदगीर यांच्यासह मोठय़ा संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.