
दिल्ली आणि जवळपास शहरातील प्रदूषण प्रचंड वाढले आहे. लागोपाठ आठव्या दिवशी एक्यूआयचा स्तर 400 पार गेला आहे. यामुळे कमीशन फॉर एयर क्वालिटी मॅनेजमेंटने ग्रेडेड रिस्पांस एक्शन प्लानमध्ये बदल केला आहे. स्टेज 2 चे अनेक नियम आता स्टेज 1 मध्ये लागू होतील. सार्वजनिक परिवहन सेवेमध्ये वाढ, सीएनजी आणि इलेक्ट्रिक बस आणि मेट्रो प्रवासात वाढ करणे, टीव्ही, रेडिओ आणि वृत्तपत्राद्वारे प्रदूषण संबंधी अलर्ट दिला जाईल. ट्रॅफिकवर नियंत्रण मिळवण्यासाठी अतिरिक्त कर्मचारी तैनात केले जातील. डिझेल जनरेटरचा उपयोग टाळण्यासाठी वीजपुरवठा खंडीत केला जाणार नाही.
रेडक्रॉसमधील 2900 लोकांच्या नोकऱ्या जाणार
आंतरराष्ट्रीय रेडक्रॉस कमिटीने दिलेल्या माहितीनुसार, 2026 चे बजेट 17 टक्क्यांनी कमी केले जाणार आहे. यामुळे हे बजेट 1.8 अब्ज स्विस फ्रँक म्हणजेच जवळपास 2.23. अब्ज डॉलरपर्यंत खाली येणार आहे. रेडक्रॉस कमिटीच्या निर्णयामुळे जवळपास 2 हजार 900 कर्मचाऱ्यांना आपली नोकरी गमवावी लागणार आहे. आर्थिक मदत कमी येत असल्याने बजेट कमी करण्याचा निर्णय रेडक्रॉस कमिटीने घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून जगभरातील अनेक टेक कंपन्यांमध्ये कर्मचारी कपात केली जात आहे. आता रेडक्रॉसमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर नोकरी गमवण्याची वेळ आली आहे.
भूतानचे पंतप्रधान बांगलादेश दौऱ्यावर
भूतानचे पंतप्रधान शेरिंग तोबगे शनिवारपासून दोन दिवसांच्या बांगलादेश दौऱ्यावर पोहोचले आहे. बांगलादेशची राजधानी ढाका येथे पोहोचल्यानंतर भूतानच्या पंतप्रधानांचे जंगी स्वागत करण्यात आले. बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस यांनी शेरिंग तोबगे यांच्यासाठी रेड कार्पेट टाकले. त्यांच्या स्वागतासाठी 19 तोफेची सलामी देण्यात आली. त्यांच्यासाठी एका खास डिनरचे आयोजन करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी भूतानचा दौरा केला. त्यावेळी भारत आणि बांगलादेश यांच्यातील संबंधात थोडा तणाव निर्माण झाला होता.
























































