कर्नाटकमध्ये पुन्हा मुख्यमंत्री बदलाची चर्चा

कर्नाटकमध्ये नेतृत्त्वबदलाच्या मुद्यावरून काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाटयावर आला आहे. उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांना मुख्यमंत्री बनविण्यची मागणी काही आमदारांनी केली असतानाच आणखी एका मंत्र्याने मुख्यमंत्रीपदावर दावा केला आहे. हे मंत्री आहेत कर्नाटकचे गृहमंत्री जी. परमेश्वर. राज्यात मागासवर्गीय समाजातील व्यक्तीला मुख्यमंत्री बनविण्याची मागणी करण्यात येत असल्याचे सांगून त्यांनीही स्पर्धेत असल्याचे संकेत दिले.