
चारकोप येथे प्रॉपर्टी डिलरवर गोळीबार केल्याप्रकरणी गुन्हे शाखेने अटक केलेल्या चौघा आरोपींना आज न्यायालयाने 23 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. या चौघांना पुण्याच्या भोर येथे जंगलात लपलेले असताना पोलिसांनी तेथून उचलले. कांदिवली पश्चिमेकडील चारकोप येथे प्रॉपर्टी डिलर फ्रेडी डिमेलो यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. गुन्हा करून आरोपी पसार झाले होते. गुन्हे शाखेच्या पथकाने शोध घेऊन राजेश चौहान, सुभाष मोहिते, मंगेश चौधरी आणि कृष्णा सिंग अशा चौघांना पुण्याच्या भोर येथील जंगलातून उचलले होते. त्या सर्वांना अटक करून आज न्यायालयात हजर केले असता त्यांना 23 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.




























































