
उद्योजक एलॉन मस्क यांनी ‘एक्स’ युसर्जसाठी नवे फिचर आणले आहे. या फिचरमुळे फेक युजर्सचा पर्दाफाश होणार आहे. हे युजर्स कोणत्या देशाचे आहेत, याबाबत माहिती मिळणार आहे. मागील आठवडय़ात सुरू झालेल्या ‘अबाऊट थीस अकाऊंट’ या फिचरमुळे युजरने त्यांच्या बायो किंवा प्रोफाईल माहितीत काहीही नमूद केले असले तरी, त्यांच्या इंटरनेट ऑक्टिव्हिटीच्या आधारावर त्यांचे देश आणि प्रदेशाचे स्थान आता अकाऊंटवर दिसणार आहे. तसेच हे फिचर युजरने त्यांचे युजरनेम किती वेळा बदलले हेदेखील दाखवते.
एलॉन मस्क यांच्या या नव्या फिचरचा फायदा राजकीय, संरक्षण क्षेत्रासह इतरही क्षेत्रांना होणार आहे. अलीकडेच अमेरिकेत मेक अमेरिका ग्रेट अगेन मोहिमेत सहभागी झालेले अनेक ‘अमेरिकन’ अकाऊंट प्रत्यक्षात परदेशी असल्याचे या फिचरमुळे आढळून आले आहे. राजकीय प्रचार किंवा दिशाभूल करणाऱ्या खोटय़ा अकाऊंटला आळा बसणार आहे.


























































