स्मृती मानधनाच्या वडिलांना डिस्चार्ज

हिंदुस्थानी महिला क्रिकेट संघाची स्टार फलंदाज स्मृती मानधनाचे वडील श्रीनिवास मानधना यांना मंगळवारी सांगली येथील हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला. हॉस्पिटल प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, त्यांची तब्येत आता स्थिर असून कोणताही धोका नाही. डॉक्टरांनी केलेल्या अँजिओग्राफीमध्ये कोणताही ब्लॉकेज नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे मानधना कुटुंबाने मोठा निःश्वास टाकला आहे. दरम्यान, पलाश मुच्छल आणि स्मृती मानधनाच्या पुढे ढकललेल्या विवाहाबाबत कुटुंब काय निर्णय घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तब्येतीत सुधारणा झाल्यानंतर आता विवाहाची नव्याने तारीख जाहीर होते का? याची उत्सुकता आहे, पण अद्याप लग्नानाबाबत कोणतीही अपडेट देण्यात आलेली नाही.