
मुंबईत झालेल्या २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याला १७ वर्षे पूर्ण झाली आहेत. यातच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी मुंबई हल्ल्यातील शहिदांना आदरांजली वाहिली आहे. X वर एक पोस्ट करत ते म्हणाले आहेत की, “२६ नोव्हेंबर २००८… मुंबईवर झालेला तो भीषण दहशतवादी हल्ला, ज्याच्या आठवणीने आजही प्रत्येक मुंबईकराच्या मनात उद्वेग दाटून येतो. त्या रात्री, केवळ मुंबईच नव्हे, तर संपूर्ण देश हादरला होता.
आदित्य ठाकरे म्हणाले, “शेकडो निष्पाप नागरिकांनी आपले प्राण गमावले. पण त्याच वेळी मुंबई पोलीस आणि सुरक्षा दलांनी दाखवलेले अतुलनीय शौर्य आणि धैर्य प्रत्येक मुंबईकराच्या मनात अभिमानाची ज्योत प्रज्वलित करते.”
ते म्हणाले, “जीवाची पर्वा न करता, ह्या शूर जवानांनी दहशतवाद्यांशी लढा दिला. त्यांचे बलिदान आणि पराक्रम अविस्मरणीय आहे. या हल्ल्यात प्राण गमावलेल्या सर्व निष्पाप नागरिकांना आणि शूरवीरांना विनम्र अभिवादन.”
२६ नोव्हेंबर २००८…
मुंबईवर झालेला तो भीषण दहशतवादी हल्ला, ज्याच्या आठवणीने आजही प्रत्येक मुंबईकराच्या मनात उद्वेग दाटून येतो.त्या रात्री, केवळ मुंबईच नव्हे, तर संपूर्ण देश हादरला होता. शेकडो निष्पाप नागरिकांनी आपले प्राण गमावले.
पण, त्याच वेळी मुंबई पोलीस आणि सुरक्षा… pic.twitter.com/V9WuTdbv6o
— Aaditya Thackeray (@AUThackeray) November 26, 2025

























































