
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या कुटुंबाच्या एकूण संपत्तीत तब्बल एक अब्ज डॉलरची घसरण झाली आहे. क्रिप्टो मार्केटमध्ये पडझड सुरू झाल्याने त्यांना सर्वाधिक फटका बसला आहे. सप्टेंबरच्या सुरुवातीला ट्रम्प कुटुंबाची एकूण संपत्ती जवळपास 7.7 बिलियन डॉलर होती. यामध्ये घसरण झाल्याने ती आता 6.7 बिलियन डॉलर झाली आहे.
ट्रम्प ब्रँडेड मेम-काॅइनने जवळपास 25 टक्के मूल्य गमावले आहे. ही घसरण ट्रम्प कुटुंबाच्या क्रिप्टो गुंतवणुकीत झाली आहे. एरिक ट्रम्प यांची बिटकाॅइन मायनिंग कंपनीत भागीदारी होती. यात घसरण झाल्याने त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. ट्रम्प मीडिया अँड टेक्नोलॉजी ग्रुप जी टत सोशियलची पॅरेंट कंपनी आहे. याचा मुख्य उद्देश क्रिप्टो ट्रेजरी तयार करणे आहे. याचे शेअर्स आता अर्ध्यावर आले आहेत. सप्टेंबरनंतर डोनाल्ड ट्रम्प यांच्या भागीदारीत जवळपास 800 मिलियन डॉलरची घसरण झाली आहे. सप्टेंबरमध्ये वर्ल्ड लिबर्टी फायनान्शियल नावाच्या ट्रम्प समर्थित क्रिप्टो वेंचरने एक्सचेंजवर ट्रेडिंग सुरू केली होती. यामुळे ट्रम्प कुटुंबाच्या संपत्तीत जवळपास 5 बिलियन डॉलरपर्यंत वाढ झाली होती. एरिक ट्रम्प यांची अमेरिकन बिटकाॅइन काॅर्पोरेशनमध्ये 7.5 टक्के भागीदारी आहे. यात अर्ध्याहून अधिक घसरण झाली आहे.




























































