
काटोलमध्ये पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी कारवाई करताना 34 किलो गांजा जप्त केला आहे. यामध्ये भाजपच्या तालुकाध्यक्षाला अटक करण्यात आली आहे. यामुळे गुन्हेगार, भ्रष्टाचार्यांना राजाश्रय देणार्या भाजपच्या धोरणाचा आणखी एक प्रकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूरमध्येच समोर आला आहे. गांजा विक्री प्रकरणात अटक झालेल्यांमध्ये काटोल ग्रामीण मंडळ भाजप युवा मोर्चा अध्यक्ष तथा डोर्ली भांडवलकरचा सरपंच भाजप युवा मोर्चाचा अध्यक्ष वैभव काळे याला अटक करण्यात आली आहे.




























































